टीम इंडियासाठी ‘सचिन- अ बिलियन ड्रिम्स’चा खास शो!

0

सचिन तेंडुलकरच्या ‘सचिन- अ बिलियन ड्रिम्स’ या सिनेमाचा प्रीमियर शो आज संध्याकाळी 6 वाजता मुंबईतील वर्सोवाजवळील पीव्हीआर चित्रपटगृहात होणार आहे.

यावेळी क्रिकेटसह विविध क्षेत्रातील दिग्गज हजेरी लावणार आहेत.

महत्त्वाचे म्हणजे भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी रवाना होण्यापूर्वी, या प्रीमियर शोला हजेरी लावणार आहे. भारतीय क्रिकेट संघ सचिनसोबत त्याचा सिनेमा पाहणार आहे.

सामान्य मुंबईकर ते क्रिकेटचा देव हा प्रवास ‘सचिन- अ बिलियन ड्रिम्स’ या सिनेमात पाहायला मिळेल.

हा सिनेमा 26 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

*