‘झोमॅटो’वेबसाईट हॅक!

0

झोमॅटो ही फूड – टेक कंपनी ग्राहकांना त्यांच्या शहरांतील हॉटेल, खाण्याची इतर ठिकाणे यांची माहिती देते.

कंपनीच्या वेबसाईटवरून मागवलेले पदार्थ घरपोचही दिले जातात.

ही सुविधा देताना ग्राहकाचे नाव, मोबाईल क्रमांक आणि पत्ता आदी माहिती साईटवर नोंदविली जाते.

जवळपास २३ देशांमधील १० हजार शहरांमध्ये या वेबसाईटचा वापर करण्यात येतो. भारतातही मोठ्या प्रमाणात या वेबसाईटचा वापर केला जातो.

ही वेबसाईट हॅक झाली असून १ कोटी ७० लाख ग्राहकांचे ई-मेल आयडी आणि हॅश्ड पासवर्ड चोरल्याची माहिती ‘हॅकरीड’ या सिक्युरीटी ब्लॉगकडून देण्यात आली आहे.

 

LEAVE A REPLY

*