झेलम एक्सप्रेस चालकाच्या सतर्कमुळे अनर्थ टळला

0

जळगाव / मध्यरेल्वेच्या मुंबईकडे जाणार्‍या रेल्वे मार्गावर लोखंडी पत्रा आढळुन आल्याने रेल्वेसह पोलीस प्रशासनात खळबळ उडाली.

घातपाताच्या उद्देशाने हा पत्रा ठेवल्या गेल्याची चर्चा झाली. परंतू तपासानंतर पत्रा रेल्वे गाडीच्या डब्यांना लावलेल्या बॅटरी बॉक्सवरील कव्हरचा असल्याचे समोर आले.

पहाटे 6 वाजेच्या सुमारास झेलम एक्सप्रेसच्या चालकाच्या लक्षात हा प्रकार आल्याने मोठा अनर्थ टळल्याचे मानले जात आहे.

भुसावळ मुंबई या मध्यरेल्वेच्या जळगाव स्टेशनपासुन जवळ असलेल्या सावखेडा शिवारातील गिरणा पंपींगजवळ लोखंडी पत्रा आढुळन आला.

अप लाईनला असलेल्या खांबा क्रमांक 451/8-9 दरम्यान पत्रा मिळाला. 5 बाय 8 इंव व 5 बाय 12 इंच साईजचा लोखंडी होता.

पहाटे झेलम एक्सप्रेसचे चालक पुणे येथे जात असतांना त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी जळगाव स्टेशन मास्तर यांना सांगितले.

यावरुन स्टेशन मास्तर यांनी लागलीच रेल्वे पोलीसांना कळविले. रेल्वे पोलीस ठाण्यात सपोनि के.बी.सिंग, हवालदार बाळू पाटील, पोकॉ सुनिल बोरसे यांना घटनास्थळी धाव घेतली.

सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत कर्मचार्‍यांनी पत्र्याबाबत खात्री केली. याचवेळी त्यांना वरिष्ठांना पत्र्याबाबत कळविले.

पोलीसांचा फौजफाटा घटनास्थळी
अमळनेरजवळ नवजीवन एक्सप्रेसची घटना ताजी असतांना सावखेडा शिवारात रेल्वे रुळावर पत्रा आढळल्याची माहिती मिळाल्याने रेल्वे प्रशासनातील अधिकारी मिळेल त्या वाहनाने घटनास्थळी पोहचले. त्यांच्यासोबत जळगाव उपविभागीय अधिकारी सचिन सांगळे, रामानंदनगर पोलीस ठाण्यातील पोनि.प्रविण वाडीले, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिपक गंधाले यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अप्पर पोलीस अधिक्षक बच्चनसिंग हे तर वाहन नसल्याने दुचाकी आले.

रेल्वेच्या अधिकार्‍यांकडून सात तास चौकशी
मुंबई लाईनवर पत्रा आढळल्याने रेल्वेचे मनमाड येथील सहाय्यक आयुक्त सुरेश चंद्र, सहाय्यक मंडळ अभियंता एस.एच.एम.नकवी, सहाय्यक मंडळ यांत्रिक इंजिनेअर जे.एन.मिना यांनी घटनास्थळी धाव घेतली. पत्रा नेमका कश्याचा? कोणी ठेवला की रेल्वेचा पडला. याबाबत प्राथमिक चौकशी करण्यात आली. ही चौकशी सकाळ पासुन 1.30 वाजेपर्यंत सुरुच होती.

पोलीसांचा हद्दीचा वाद पुन्हा चव्हाटावर
लोखंडी पत्र्याचे दोन तुकडे पडल्याचे रेल्वे पोलीसांनी एमआयडीसी पोलीसांना कळविले. हद्दीचे कारण सांगत एमआयडीसी पोलीसांनी रेल्वे पोलीसांना रामानंदनगर पोलीस ठाण्यामध्ये पाठविले. यानंतर रामानंदनगर पोलीसांनी तालुक्याला पाठविले.

LEAVE A REPLY

*