जोधपूर कोर्टातून 3 मिनिटांतच बाहेर आला सलमान

0
लमान खान शुक्रवारी आपला बेल बाँड भरण्यासाठी जोधपूर कोर्टात हजर झाला होता.
फक्त तीन मिनिटांतच त्याने बेल बाँडवर स्वाक्षरी केली आणि परत आला.
या प्रकरणात सलमानची सुटका केल्याच्या ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला राज्य सरकारने आव्हान दिले आहे.
राजस्थानात न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे अनेक दिवसांपासूनचे आंदोलन गुरुवारी संध्याकाळी संपण्याबरोबरच सलमानचा कोर्टात हजर होण्याचा मार्ग मोकळा झाला.
सलमानविरुद्ध 1998 पासून जोधपुरात अवैध रीतीने शस्त्रे बाळगणे आणि त्याद्वारे शिकार करण्याचे प्रकरण सुरू आहे. ट्रायल कोर्टाने त्याला जानेवारी महिन्यात या केसमधून मुक्त केले होते.
बेल बाँड भरण्यासाठी त्याला मागच्या महिन्यातच जोधपुरात यावे लागणार होते, परंतु न्यायाधीशांची बदली झाल्याने प्रकरणाची सुनावणी टळली.
याच प्रकरणात बेल बाँड भरण्यासाठी सलमान शुक्रवारी जोधपूर कोर्टात हजर झाला होता.

LEAVE A REPLY

*