…जेव्हा आलिया भट्ट सिद्धार्थ मल्होत्राच्या आई-वडिलांना भेटते!

0

आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे बॉलिवूडचे मोस्ट हॅपनिंग कपल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

करणने नुकतीच आपल्या घरी एक पार्टी ठेवली होती. या पार्टीत सिद्धार्थच्या आई-वडिलांनाही अगत्याचे निमंत्रण होते. मग काय, या पार्टीच्या निमित्ताने आलिया सिद्धार्थच्या आई-वडिलांना भेटली.

आलिया सिद्धार्थच्या आई-वडिलांना भेटली, याची फार चर्चा होऊ नये, म्हणून तिने लगेच पार्टीतून काढता पाय घेतला. पण शेवटी या नियोजित भेटीचे गुपित बाहेर आलेच. आलिया व सिद्धार्थच्या चाहत्यांसाठी निश्चितपणे ही आनंदाची बातमी आहे.

सिद्धार्थ व आलिया भलेही अधिकृतपणे आपले रिलेशन मान्य करायला तयार नसतील. पण दोघेही एकमेकांवर किती प्रेम करतात, याची हिंट न चुकता देतात. दोघेही अनेकदा एकत्र इव्हेंटला जातात. कधी पार्टी तर कधी डिनर डेट एन्जॉय करतात. या लव्हबर्ड्सच्या नात्याला कुणाचीही दृष्ट लागू नये, इतक्याच शुभेच्छा आपण देऊयात.

आलिया व सिद्धार्थची जोडी लवकरच ‘आशिकी3’मध्ये दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.

अर्थात याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

LEAVE A REPLY

*