जि.प.तील लिपीक रवींद्र बेडसे निलंबित

0

धुळे /येथील जिल्हा परिषदेचे शिक्षण विभागाचे लिपीक रविंद्र भटू बेडसे यांना शिक्षण उपसंचालकांनी तडकाफडकी निलंबित केले आहे.

यासंदर्भात आज दि.3 मे रोजी आदेश काढण्यात येवून बेडसे यांना कार्यमुक्त करण्यात आले.

नागरी सेवा नियम 1989 च्या नियम 4, पोटनियम 1 अन्वये ही कारवाई करण्यात आली.

निलंबनाचे आदेश असेपर्यंत बेडसे यांना कार्यालयाचे मुख्यालय परवानगीशिवाय सोडता येणार नाही असेही शिक्षण उपसंचालकांनी आदेशात म्हटले आहे.

त्यांच्याकडचा पदभार काढून घेण्यात आला असून इतर सहकार्‍याकडे सोपविण्याबाबत शिक्षण उपसंचालकांनी आदेशात म्हटले आहे.

बेडसे यांच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती संघटना धुळे, नारायण पुनाजी पाटील धुळे, जिल्हा परिषदेचे वरिष्ठ लिपीक वाय.एन.पाटील, लामकानी येथील परशुराम पाकळे आणि आ.अनिल गोटे यांनी तक्रारी केल्या होत्या.

बेडसे हे वादग्रस्त लिपीक म्हणून जिल्हा परिषदेत ओळखले जातात.

त्यांच्याबाबत अनेक तक्रारी दाखल झाल्याने आ.अनिल गोटे यांनी थेट शिक्षणमंत्र्यांना याबाबत पत्र लिहिले होते.

त्याचप्रमाणे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सहसचिव यांनीही तक्रारीचे पत्र पाठविले होते.

LEAVE A REPLY

*