जिल्हा युवासेनेचा आदित्य महोत्सव खा. संजय राऊत यांच्याहस्ते वृक्षारोपण

0
धुळे । दि.12 । प्रतिनिधी-जिल्हा युवासेनेतर्फे आदित्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार शिवसेना युवासेनेच्या वतीने खा.संजय राऊत यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
आदित्य महोत्सवाची सुरवात वृक्षरोपणातून करण्यात आली. यावेळी शिवसेना जिल्हा कार्यालयासमोर वृक्षारोपण करण्यात आले. घर तेथे वृक्ष अभियानाची सुरवात करण्यात आली.

याप्रसंगी उपस्थित धुळे नंदुरबार पालकमंत्री दादा भुसे, संपर्क प्रमुख बबनराव थोरात, जिल्हाप्रमुख हिलाल माळी, हेमंत साळुंखे, शिवआरोग्य शिवसेना प्रदेशाध्यक्षा डॉ. माधुरी बोरसे, महानगरप्रमुख सतिष महाले, माजी आमदार शरद पाटील, भुपेंद्र लहामगे, अतुल सोनवणे, राजेंद्र पाटील, संदीप सुर्यवंशी, छोटु खरात आदी शिवसैनिक उपस्थित होते.

सदर वृक्षरोपण कार्यक्रमाचे आयोजन युवासेना जिल्हा युवा अधिकारी अ‍ॅड. पंकज गोरे, युवती अधिकारी ऐशर्व्या अग्रवाल, संदिप मुळी, हरिश माळी, निलेश चौधरी, सागर मोरे, भुषण सोनगीरे, स्वप्निल सोनवणे, दिपक देसले, नैनेश, रुणवाल,अमोल पटवारी व युवासेना पदाधिकारींनी केले.

LEAVE A REPLY

*