जिल्हा बँक पदाधिकारी भेटीला खो; मुख्यमंत्र्यांकडून भेट दोन दिवसांनंतर

0

नाशिक । दि. 3 प्रतिनिधी : जिल्हा बँकेच्या आर्थिक स्थितीचे अवलोकन करून देण्यासाठी मुंबईला गेलेल्या पदाधिकार्‍यांना मुख्यमंत्र्यांकडून दोन दिवसानंतर भेटण्याची तारीख देण्यात आलेली आहे.

त्यामूळे बैठकीला खो मिळाला आहे.

जिल्हा बँकेला कर्ज वाटपासाठी शिखर बँक आणि नाबार्डकडून कर्ज मिळावे, यासाठी पालकमंंत्र्यांच्या मधस्थीने जिल्हा बँकेचे चेअरमन, संचालक आदी पदाधिकारी आज मुंबईला मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले होते.

मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वेळापत्रक व्यस्त असल्याने जिल्हा बँकेच्या पदाधिकार्‍यांना मुख्यमंत्र्यांची वेळ मिळू शकली नाही.

दोन दिवसांनी मुख्यमंत्री भेटतील, असे कळवण्यात आल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी माहिती देताना सांगितली.

LEAVE A REPLY

*