जिल्हा परिषद सोसायटीला सव्वा तीन कोटींचा नफा

0

सोपान हरदास : वार्षिक उलाढाल 10 कोटींच्या पुढे

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीला 2016-2017 या आर्थिक वर्षात तीन कोटी 24 लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. सोसायटीचे वार्षिक उत्पन्न 10 कोटी 22 लाख रुपये असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सोपान हरदास यांनी दिली. संस्थेची 90 वी वार्षिक सर्व साधारणसभा रविवारी (दि.4) लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती उपाध्यक्ष संजय चौधरी यांनी दिली.

संस्थेचे 2016 अखेर शेअर्सवर 13.50 टक्के लाभांश देण्याची संचालक मंडळाने शिफारस केली आहे. 2017 अखेरच्या कायम निधीवर 10 टक्के व्याज देण्याचे ठरले आहे. शेअर्सवरील लाभांश व कायम निधी वरील व्याजाची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर सभेच्या दुसर्‍या दिवशी वर्ग करण्यात येणार आहे.
खर्चात काटकसर,पारदर्शी कारभार व सभासदांना चांगली सेवा यामुळे ठेवीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊन बँकेची कॅशक्रेडिट निरंक झाले आहे. जिल्हा बँकेकडे 9 कोटी 32 लाखाची मुदत ठेव खाती गुंतवणूक केली आहे. मार्च 2017 अखेर सभासद संख्या 3188 असुन वसूल भाग भांडवल 17 कोटी रुपये, फंड्स 10 कोटी, ठेवी 47 कोटी रुपये, सभासदांना कर्ज वाटप 80 कोटी रुपये केले आहे. संस्थेने सभादांचा 5 लाखाचा अपघात विमा काढलेला आहे.अपघातामध्ये मयत झालेल्या 2 सभासदांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये प्रमाणे विमा कंपनीकडून मिळालेली पॉलीसी रक्कम 10 लाख रुपये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे हस्ते अदा केले. एका सभासदास अपघात विमा 85 हजार 714 रुपये विमा कंपनीकडून मिळाले. तसेच 8 मयत सभासदांच्या वारसांना 40 हजार सानुग्रह अनुदान तातडीची मदत दिली, 7 मयत सभासदांचे लाख 88 हजार रुपये कर्ज माफ केले.
सभासदांना पास बुक देण्यात आले. वेबसाईटवर सर्व योजनांची अद्यावत माहिती उपलब्ध करून दिली आहे. वेबसाईटवर सभादास स्वत:चे खाते पाहता येते. थकबाकीदार सभासदावर पत्र.नोटीस,फेडरेशन मार्फत कार्यवाही करून सन 2016-2017 मध्ये 20 लाख रुपये थकबाकी वसूल करण्यात आली. सर्व योजनांची आद्यावत माहिती दिनदर्शिकाव्दारे सभासदांना पोहचविण्यात आली. जूनच्या पहिल्या आठवड्यात डिव्हिडंड वाटप होणार असल्याने सभासदांना मुलांचे शैक्षणिक खर्च भागविण्यात मदत होईल. संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विशेष गुणवत्ता प्राप्त सभासदांच्या मुलांना पारितोषिक रोख 1 हजार रुपये व प्रमाणपत्र तसेच सन्मानचिन्ह वितरण करण्यात येईल तरी सर्व गुणवत्ता प्राप्त पाल्यानीही सभेस उपस्थित रहावे असे आवाहन संचालक संजय कडूस, सुभाष  कराळे, अरुण जोर्वेकर, भरत घुगे ,अरुण शिरसाठ, विलास वाघ, प्रताप गांगर्डे, ज्ञानदेव जवणे, हरी शेळके, मोहन  जायभाये, राजाबापु पाठक, वालचंद ढवळे, नारायण बोराडे,  इंदु गोडसे,  शशिकांत रासकर, श्री अशोक  काळापहाड, संतोष  नलगे, उषा  देशमुख,  राजेंद्र  म्हस्के, अशोक  बनकर, विजयकुमार कोरडे ,स्मिता वैजापूरकर , यमुना विखे व जयराज बारवकर ,  व्यवस्थापक अविनाश शिदोरे, उप व्यवस्थापक राजेंद्र पवार, सभासद व सर्व कर्मचारी वृंद यांनी केले.18

LEAVE A REPLY

*