जिल्हाधिकाऱ्यांनी पकडून दिले ऍथलेटिक प्रशिक्षकाचे हल्लेखोर

0
ऍथलेटिक  प्रशिक्षक वैजीनाथ काळे यांच्यावर सकाळी आसाराम बापू पुलाजवळ चाकूने हल्ला झाल्याची घटना घडली. याचवेळी जिल्हाधिकारी याठिकाणीच मॉर्निंग वॉकसाठी आलेले होते. त्यांनी घटना घडल्यानंतर पोलिसांशी संपर्क साधत घटनेची तत्काळ माहिती दिली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघा हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहित अशी की, ऍथलेटिक  प्रशिक्षक वैजीनाथ काळे यांच्यावर सकाळी आसाराम बापू पुलाजवळ आपल्या विद्यार्थी खेळाडूंसोबत आसाराम बापू पुलाजवळ सकाळी प्रशिक्षण देत होते. दरम्यान याठिकाणी मोटारसायकलीवरून आलेल्या दो घा तरुणांनी विद्यार्थी खेळाडूंची छेड काढली. त्यावरून प्रशिक्षक वैजिनाथ काळे यांनी या तरुणांना हटकले. त्याचा राग मनात धरून दोघा तरुणांनी त्यांच्या पोटावर आणि डोक्यावर चाकूने वार केले.

यात प्रशिक्षक वैजिनाथ काळे जखमी झाले त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हल्लेखोरांनी काळे यांना जखमी केल्यानंतर तिथून पळ काढला. घटनेची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना दिली त्यानंतर पोलीस यंत्रणेने सूत्रे फिरवत दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.

LEAVE A REPLY

*