जायकवाडी इकोसेन्सिटीव्ह झोनमध्ये मासेमारीबंदी : राष्ट्रवादीचा विरोध

0

भेंडा (वार्ताहर) – जायकवाडी जलाशय परिसरातील राष्ट्रीय उद्यान म्हणून अधिसूचित करण्यात आलेल्या क्षेत्रात (इकोसेन्सेटीव्ह झोन) मच्छिमारांना मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. याला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध असून या निर्णयाविरुद्ध राष्ट्रवादी आंदोलन छेडणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी दिली.

 

जायकवाडी जलाशय क्षेत्रात मासेमारी करून उपजीविका करणारे अनेक कुटूंंब असून अनेक मच्छिमार सोसायट्यांची शासनाकडे नोंदणी झालेली आहे.जायकवाडी जलाशय परिसरात मासेमारी करू नये असे आदेश देण्यात आलेले आहेत. परंतु असे झाल्यास मासेमारी करून उपजीविका करणार्‍या लोकांची उपासमार होणार आहे. गेल्या आठ-दहा दिवसापासून वन विभागाकडून जायकवाडी जलाशय परिसरातील मच्छिमारांचे जाळे-बोटी जप्तीची कारवाई सुरू आहे. त्यामुळे मच्छिमारी करणार्‍या लोकांमध्ये संतापाची भावना असून त्यांच्या उपजीविकेचा प्रश्‍न निर्माण झालेला आहे.

 

 

मासेमारी करीत असताना पर्यावरणाची कुठलीही हानी होत नाही. त्यामुळे शासनाने मासेमारी बंद करू नये. तसेच मासेमारांचे जाळे-बोटी जप्तीची कारवाई त्वरित थांबवावी. अशी मागणी करून तसे न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

*