जामनेर तालुक्यात चोरट्यांचे थैमान

0

जामनेर /बेटावद खुर्द ता.जामनेर येथे एका वृध्द दाम्पत्याला बेदम मारहाण करून रक्तबंबाळ अवस्थेत सोडून सुमारे एक लाख रूपयांचा ऐवज सोबत घेवून मध्यरात्री दरोडेखोर पसार झाल्याची घटना दि.3 रोजी पहाटे उघडकीस आली.

गावाच्या शिवशेजारी असलेल्या शेतामध्ये एक खाली करून राहत असलेले पती-पत्नी किसन रामकृष्ण डोंगरे (वय 80) व दगडाबाई किसन डोंगरे (वय 75) हे दोघे नेहमी प्रमाणे झोपले होते.

गाढ झोपेत असतांना अचानक चार ते पाच चोरटे त्यांच्याजवळ येवून पैशांची मागणी करू लागले.

सुरूवातीला दोघा वृध्दांचा विरोध लक्षात येताच वृध्द पती,पत्नीला दरोडेखोरांनी बेदम मारहाण करण्यांस सुरूवात केली.

दरम्यान दरोडेखोरांनी चांदीच्या पाटल्या, सोन्याची अंगठी, जोडवे, मंगळसुत्र, रोकड दोन हजार असा सुमारे एक लाख रूपयाचा ऐवज घेवून लागलीच पसार झाले.

हि घटना सकाळी पाच वाजता पुतण्याला दिसल्याने ग्रामस्थांना घटनेची माहीती दिली.आणि त्यानंतर पोलीसांनाही कळविले.

शहरातील नहाटा नगर मधील रहिवासी ईश्वर रामदास महाले हे गेल्या तीन दिवसापासून घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते.

घराला कुलूप असल्याचे पाहून चोरट्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश करून घरातील पाच लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली.

घरातील 13 तोळे सोने अंगठी,चैन, पोत,झुमके अशा दागीन्यांसह रोख रक्कम 20 हजार रूपये घेवून चोरटे पसार झाले.

बुधवारी महाले हे दुपारी आपल्या परिवारासह घरी परतले तेव्हा त्यांच्या लक्षात ही बाब आली.

घटनेची माहिती महालेंनी पोलीसांना दिली.पोलीस  तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

जळगावहून सायंकाळी श्वानपथक पाचारण करण्यात आले परंतु पाहीजे तसा सुगावा लागला नाही

 

LEAVE A REPLY

*