जाणून घ्या, प्रियांका चोप्रा कशी ठेवते पैशांचा हिशेब?

0

प्रियांका नेहमीच तिचे पैसे योग्य पद्धतीने बचत (मॅनेज) करण्यासाठी ओळखली जाते.

पण तरीही एवढ्या पैशांचा हिशेब प्रियांका किंवा बाकी कलाकार कसा काय ठेवत असतील, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत असेल.

नुकताच प्रियांका चोप्राने ‘ब्लूमबर्ग’ला ती तिचा बँक बॅलेन्स कसा सांभाळते याबद्दल सांगितले.

‘मी माझे पैसे तीन विभागात वाटते. मला किती रुपयांची बचत करायची आहे, किती खर्च करायचे आहेत आणि किती रुपयांचे दान करायचे आहे हे मी आधीच ठरवते.’ असे प्रियांकाने सांगितले. सर्वोत्तम सेव्हिंग काय असेल असा प्रश्न जेव्हा तिला विचारला तेव्हा तिने मुंबई आणि गोव्यात स्वतःची जमीन असणं हे सध्या सर्वोत्तम सेव्हिंग असल्याचं म्हटलं.

LEAVE A REPLY

*