जस्टिन बिबरच्या ‘त्या’ फोटोला २ लाखा पेक्षा जास्त लाइकस!

0

नुकतेच जस्टिन बिबरने ‘जेल नॉट अ कूल प्लेस’, ‘  नॉट फन’, ‘ नेव्हर अगेन’ हे हॅशटॅग्ज वापरून इन्स्टाग्रामवर एक फोटो अपलोड केला आणि २ लाख ३२२ हजार ६७८ पेक्षा जास्त चाहत्यांनी त्याला लाइक, कॉमेंट आणि शेअर केले आहे.

हा फोटो फ्लोरिडा येथील तुरुंगात कैदी म्हणून काढण्यात आला होता. तीन वर्षांपूर्वी फ्लोरिडा पोलिसांनी त्याला दारू पिऊन नागरिकांना मारणे आणि नियमबाह्य़ पद्धतीने कार रेसिंग करणे यासाठी अटक के ली होती.

त्या वेळी संपूर्ण दिवस तुरुंगवास भोगणाऱ्या जस्टीनला त्याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता.

तुरुंगातून बाहेर आल्यावर अशी चूक आपण पुन्हा करणार नाही आणि जेव्हा कधी माझ्या हातून असं काही घडण्याची शक्यता निर्माण होईल तेव्हा मला हा दिवस नक्की आठवेल, असे आश्वासनही त्याने चाहत्यांना दिले होते.

LEAVE A REPLY

*