जळगाव पास, भुसावळ नापास

0

जळगाव / स्वच्छ भारत स्पर्धेत देशातील 434 शहरांचा समावेश करण्यात आला होता.

या स्पर्धेअंतर्गत केंद्रीय पथकाकडून तपासणी करुन गुणांकन निश्चित करण्यात आले.

2000 गुणांपैकी जळगाव शहराला 1083 गुण मिळवून 162 व्या क्रमांकावर स्थान मिळविले तर भुसावळ शहराला केवळ 345 गुण प्राप्त झाले.

प्राप्त गुणांकनामुळे स्वच्छ भारत स्पर्धेत जळगाव शहर पास झाले असून भुसावळ शहराला नापास होण्याची वेळ आली आहे.

स्वच्छ भारत अंतर्गत देशतील 434 शहरांचा समावेश करण्यात आला होता.

या शहरांमध्ये जिल्ह्यातील जळगाव आणि भुसावळ शहराचा समावेश होता. या स्पर्धेत आरोग्यबाबत मनपा, नपाचे कागदपत्र, आरोग्याबाबत नागरीकांच्या प्रतिक्रिया, उपाययोजना आणि समितीकडून प्रत्यक्ष केलेली पाहणी यासाठी 2000 गुण निश्चित करण्यात आले होते.

त्यानुसार केंद्रीय समितीने जळगाव व भुसावळ शहराची पाहणी केली. 2000 गुणांपैकी जळगाव शहराला 1083 गुण प्राप्त झाले.

यात कागदपत्रांसाठी 543, समितीने केलेल्या पाहणीतून 284 तर नागरीकांनी दिलेल्या प्रतिक्रियांमधून 265 असे 1083 गुण मिळाले.

त्यामुळे 434 शहरांमधून जळगाव शहराने 162 व्या क्रमांकावर स्थान मिळवले. तर राज्यात 44 शहरांपैकी 18 व्या क्रमांकावर स्थान मिळविले.

भुसावळ शहराला 2000 गुणांपैकी केवळ 345 गुण मिळाले असून यादीत 433 क्रमांकावर नाव आहे.

घनकचरा प्रकल्पाअभावी जळगाव शहराचे नुकसान
जळगाव शहरात हंजीर बायोटेकने घनकचरा प्रक्रिया प्रकल्प बंद केल्यानंतर नवीन प्रकल्प सुरु करण्यासाठी महापालिकेने पाठपुरावा केलेला नाही.

घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाअभावी 300 गुण कमी झाले. त्यामुळे जळगाव शहराला 162 व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

स्पर्धेसाठी प्रशासनाने केली होती तयारी
स्वच्छ भारत स्पर्धेसाठी मनपा प्रशासनाने आरोग्याच्या तक्रारीसाठी ऑनलाईन तक्रारीची सुविधा सुरु केली होती. आरोग्याच्या वाहनांवर जीपीस यंत्रणा कार्यान्वीत केली. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून शहरात स्वच्छता मोहीम, शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून परिसर स्वच्छता तसेच स्वच्छतेबाबत जनजागृती केली होती.

LEAVE A REPLY

*