जम्मू-श्रीनगर : अमरनाथ यात्रेकरुंची बस दरीत कोसळली; 11 जणांचा मृत्यू

0

जम्मू-श्रीनगर महामार्गावरील बनिहाल येथे अमरनाथ यात्रेला यात्रींना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला असून 30 जण जखमी झाले आहेत.

अपघात कसा घडला, हे अद्याप समजले नाही.

घटनेनंतर तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आलं असून भाविकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

जखमींना दरीतून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्याचं काम सुरु आहे. ही बस अमरनाथ यात्रेच्या भाविकांना जम्मूहून पहलगाम इथे घेऊन जात होती. रस्त्यातच ही दुर्दैवी घटना घडली.

LEAVE A REPLY

*