जम्मू-काश्मीर: दहशतवाद्यांचा पोलिसांच्या पथकावर हल्ला, २ पोलीस शहीद

0

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या हल्ल्यांत दोन पोलीस शहीद झाले आहेत.तर एक जखमी झाला आहे.

दहशतवाद्यांनी काल रात्री श्रीनगरमधील हैदरपोरा येथे पोलीस पथकावर अंदाधुंद गोळीबार केला.

या हल्ल्यात दोन पोलीस गंभीर जखमी झाले होते. त्यांना लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गंभीर जखमी झालेले कॉन्स्टेबल शहजाद यांचा मृत्यू झाला.

तर दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात घराबाहेरच पोलीस दलातील शबीर अहमद यांना गोळ्या घातल्या. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत, असे वृत्त पीटीआयने दिले आहे.

LEAVE A REPLY

*