जम्मू काश्मीर : क्रिकेटपटूंनी गायिले पाकिस्तानचे राष्ट्रगीत

0

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथील स्टेडियमवर क्रिकेट सामन्याच्या आधी स्थानिक क्रिकेटपटूंनी पाकिस्तानचे (पाक व्याप्त काश्मीर) राष्ट्रगीत गायिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

इतकेच नाही तर हा प्रकार सोशल मीडियावरही लाइव्ह करण्‍यात आला. आता हा व्हिडिओ व्हायरल झाला असून दोन्ही संघाचे क्रिकेटपटू राष्ट्रगीत गाताना दिसत आहेत.

न्यूज एजन्सीनुसार, ही घटना 21 मेची आहे. एका क्रिकेट टूर्नामेंटच्या फायनलच्या सुरुवातीला दोन्ही संघाच्या क्रिकेटपटूंनी पीओकेचे राष्ट्रगीत गायिले. शायनिंग स्टारविरुद्ध पुलवामा टायगर्स यांच्यात ही लढत झाली होती.

व्हिडिओमध्ये दोन्ही संघातील क्रिकेटपटूंनी ब्लू जर्सी परिधान केलेले दिसत आहेत.

स्टेडियमजवळ पुलवामा डिग्री कॉलेज आहे. कॉलेजमधील विद्यार्थी खोर्‍यात तैनात असलेल्या लष्कराच्या जवानांना कायम विरोध करत असतात.
काश्मीरमध्ये पीओकेचे राष्‍ट्रगीत गायिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.

LEAVE A REPLY

*