जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला

0

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील मीर बाजार येथे पोलिसांच्या पथकांवर दहशतवाद्यांनी पुन्हा हल्ला केला आहे.

या हल्ल्यात एक पोलीस शहीद तर 3 नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत दहशतवादी फैयाज अहमद उर्फ सेठाला कंठस्नान घालण्यात यश आले आहे.

सेठा हा दहशतवादी 2015 पासून फरार होता. मीर बाजार येथे पोलिसांचे गस्ती पथक आले असताना दहशतवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार करण्यास सुरुवात केला. या गोळीबाराला प्रत्युत्तर पोलिसांकडून देण्यात आले, यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले.

फेब्रुवारीत दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता, तर दोन जवान शहीद झाले होते.

LEAVE A REPLY

*