जमीन व्यवहारात फसवणूक

0

पोलिसांत गुन्हा दाखल परस्पर दिली खरेदी

अहमदनगर (प्रतिनिधी)  –  जमीन खरेदी-विक्री व्यवहारात फसवणूक झाल्याप्रकरणी  स्थायी समितीचे सभापती सचिन जाधव यांच्यासह आठ जणांविरुध्द पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

डॉ. प्रकाश कांकरिया, संजय भगवान बुधवंत, रफिक हुसेन शेख, मोहमंद उमर इब्राहीम शेख, डॉ.सुधा कांकरीया, सचिन जाधव, सादीक शेख, योगेश बाळू शिंदे, गौरव पांडूरंग बेल्हेकर अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

भिंगार हद्दीतील सर्व्हे नंबर 23 मधील क्षेत्र 8093 चौ.मी जमीनीचे बनावट कागदपत्र तयार करून बेकायदेशीर विक्री करून फसवणूक केल्याची तक्रार मुंबईचे पवन चंदूलाल खेमाणी (वय 35 रा. मुंबई) यांनी पोलिसांत दिली आहे.  खेमाणी यांच्या तक्रारीनुसार , भिंगार येथील हद्दीतील सर्व्हे नंबर 23 मधील 8093.73 चौ.मी. क्षेत्र आहे. ही जमीन कांकरिया यांनी खोमणे  यांना कायम खरेदी दिली. ताबा पावती व कधीही रद्द  न होणारे मुखत्यारपत्र हमीपत्र, घोषणापत्रही लिहून दिले. असे असतानाही कांकरिया यांनी त्यातील 5 हजार 260 चौ.मि. क्षेत्र हे संजय बुधवंत यांना खरेदी दिले. डॉक्टर कांकरिया व इतर आरोपींनी वेळोवेळी धमकी देऊन खरी माहिती लपवून ठेवत बनावट दस्त तयार करून बेकायदेशीर रित्या जागेचा खेरदी व्यवहार केल्याचे खोमणे यांनी तक्रारीत म्हटले आहे. भिंगार पोलिसांनी डॉकटर कांकरिया दामपत्यासह आठ जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक ए. एम. परमार हे अधिक तपास करत आहे.

LEAVE A REPLY

*