जमीन व्यवहारात फसवणूक

0

पोलिसांत गुन्हा दाखल; परस्पर दिली खरेदी

 

अहमदनगर (प्रतिनिधी) – जमीन खरेदी-विक्री व्यवहारात फसवणूक झाल्याप्रकरणी स्थायी समितीचे सभापती सचिन जाधव यांच्यासह आठ जणांविरुध्द पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

 

डॉ. प्रकाश कांकरिया, संजय भगवान बुधवंत, रफिक हुसेन शेख, मोहमंद उमर इब्राहीम शेख, डॉ.सुधा कांकरीया, सचिन जाधव, सादीक शेख, योगेश बाळू शिंदे, गौरव पांडुरंग बेल्हेकर अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. भिंगार हद्दीतील सर्व्हे नंबर 23 मधील क्षेत्र 8093 चौ.मी जमिनीचे बनावट कागदपत्र तयार करून बेकायदेशीर विक्री करून फसवणूक केल्याची तक्रार मुंबईचे पवन चंदूलाल खेमाणी (वय 35 रा. मुंबई) यांनी पोलिसांत दिली आहे.

 

 

भिंगार येथे या वादातील जमीन आहे. ही जमीन कांकरिया यांनी खोमाणी यांना कायम खरेदी दिली. ताबा पावती व कधीही रद्द न होणारे मुखत्यारपत्र हमीपत्र, घोषणापत्रही लिहून दिले. तरीही कांकरिया यांनी त्यातील काही क्षेत्र हे बुधवंत यांना खरेदी दिले. तसेच बनावट दस्त तयार करून बेकायदेशीर रित्या जागेचा खेरदी व्यवहार केल्याचे खोमाणी यांनी तक्रारीत म्हटले आहे.

 

 

हा जागेचा वाद आहे. पाच वर्षांपूर्वी एका जागेचा करार करण्यात आला होता. हा करार संपल्यामुळे पुन्हा तो करायचा नाही यासाठी आरोपींनी फौजदारी गुन्हा करण्यासाठी हे षड्यंत्र रचले आहे. या वादात आरोपींनी न्यायालयाचा अवमान केला आहे. तसेच त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यासाठी आम्ही न्यायालयात जाणार आहोत, अशी प्रतिक्रिया डॉ. प्रकाश कांकरिया यांनी दिली.

LEAVE A REPLY

*