जनरल मोटर्सची देशातील विक्री बंद

0
अमेरिकेची जनरल मोटर्स (जीएम) कंपनी या वर्षीच्या शेवटी भारतातील कार विक्री बंद करणार आहे.
सुमारे दोन दशकांपासून प्रयत्न केल्यानंतरही भारतीय बाजारातील विक्री वाढवण्यात कंपनीला यश आलेले नाही. जगातील तिसरी सर्वात मोठी कार कंपनी जीएमची भारतीय बाजारातील भागीदारी एक टक्क्यांपेक्षाही कमी आहे.
त्यामुळे कंपनीने भारतीय बाजारातील विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. असे असले तरी भारतातील कंपनीचे प्रकल्प बंद करण्यात येणार नाहीत.
येथे तयार झालेल्या कार निर्यात होणार आहेत.
जीएमचा प्रमुख उत्पादन प्रकल्प राज्यातील तळेगाव येथे आहे. बंगळुरूमधील “टेक्नॉलॉजी सेंटर’देखील सुरूच राहणार आहे.
गुजरातेतील हलोल येथील प्रकल्प २८ एप्रिल रोजीच बंद करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*