जगातील टॉप-25 गेमचेंजर्समध्ये मुकेश अंबानी प्रथम

0
जगात अब्जावधी लोकांच्या आयुष्यासह उद्योग जगतात बदल आणणाऱ्या टाॅप-२५ प्रमुख व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी पहिल्या क्रमांकावर आहेत.
अमेरिकी बिझनेस मासिक फोर्ब्जने ‘ग्लोबल गेम चेंजर्स’ची दुसरी यादी जाहिर केली आहे.
एकीकडे अनेक उद्योजक केवळ वार्षिक महसूल वाढवण्याचा प्रयत्न करत असताना काही उद्योजक सर्वसामान्य व्यक्तींच्या आयुष्यात बदल आणत आहेत. ते भविष्य निश्चित करत असल्याचे फोर्ब्जने म्हटले.
भारतीय इंटरनेट सेवेत क्रांती आणल्यामुळे फोर्ब्जने मुकेश अंबानी (६०) यांना पहिल्या क्रमांक दिला आहे. तेल व वायू क्षेत्रातील या व्यावसायिकाने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात देशातील दूरसंचार क्षेत्रात धमाकेदार प्रवेश केला होता.
अत्यंत कमी दरात इंटरनेट सेवा पुरवून त्यांनी केवळ सहा महिन्यांत १० कोटी ग्राहकच बनवले, असे नाही, तर दूरसंचार उद्योगात विलीनीकरण-एकत्रीकरणाची लाट आणली. प्रतिस्पर्धी कंपन्यांना बाजारात टिकण्यासाठी नवनवीन धोरणांचा अवलंब करण्यासाठी बाध्य केले. फोर्ब्जने मुकेश अंबानी यांच्या ‘जे काही डिजिटल होऊ शकते, ते होत आहे. यात भारत मागे राहू शकत नाही.’ या वाक्याचाही उल्लेख केला आहे.
या यादीत समावेश असलेल्या २५ व्यक्तींमध्ये १३ व्यक्ती अमेरिकी आहेत, तर चीनच्या तीन आणि इंग्लंडमधील दोन व्यक्तींचा यात समावेश आहे. इतर सहा व्यक्तींमध्ये एक-एक अनुक्रमे इस्रायल, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, सौदी अरब, ब्राझील, दक्षिण आफ्रिका येथील आहेत.

LEAVE A REPLY

*