चोरीला गेलेला पाच लाखांचा मुद्देमाल मुळमालकांना परत

0

नंदुरबार / जिल्ह्यात चैन स्नॅचिंग गुन्ह्यातील आरोपींना अटक करुन त्यांच्याकडील 22 तोळे वजनाचे सोनेचांदीचे दागिने असा 5 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन मुळमालकांना परत देण्यात आला आहे.

पोलीस अधिक्षक राजेंद्र डहाळे, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत वाघुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने विशेष प्रयत्न करुन गुजरात राज्यात पळून गेलेल्या आरोपींना अटक करण्यात आली आहे.

त्यांच्याकडून 10 गुन्ह्यातील 22 तोळे वजनाचे सोन्याचांदीचे 5 लाख 1 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन त्यांच्याविरुद्ध न्यायालयात खटला दाखल करण्यात आला.

मिळालेला मुद्देमाल फिर्यादी मालकांना परत करण्याबाबत आदेश प्राप्त करुन त्यांना तो आदरपूर्वक परत करण्यात आला. याबाबत उपस्थित फिर्यादींतर्फे पोलीस अधिक्षक राजेंद्र डहाळे यांचा अभिनंदनपर सत्कार करण्यात आला.

 

 

LEAVE A REPLY

*