चोपडा येथील शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू

0

अडावद,ता चोपडा / येथून जवळ असलेल्या वटार ता चोपडा येथील जगन साहेबराव पाटील वय ६८ यांचे उष्माघाताने मृत्यू झाला.

 आपल्या शेतात दिवसभर पाणी भरण्याचे काम करुन ते घरी आले .

रात्री ताप, डोके दुखणे व मळमळ असे होत असल्याने  घरगुती उपचार रात्रभर केले .

 त्यांना चोपडा येथील डॉ स्नेहल भामरे यांच्याकडे खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल असता

त्यांनी प्राथमिक तपासणी करीत उपजिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला .

जगन पाटील यांना उपजिल्हा रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत विझली.

जगन पाटील यांचा एकुलता एक कर्ता मुलगा सुमारे आठ वर्षांपूर्वी मयत झाला आहे त्याच्या घरात पत्नी ,विधवा सून व दोन नातवंडे असा परिवार आहे

LEAVE A REPLY

*