चार पिढ्यांचा वारसा जपणारा ‘गोल्डन बॅण्ड’

0

खान्देशातील नावाजलेले, अस्सल खान्देशी गीतांनी मोहून टाकणारे आणि संगीताच्या तालावर वर्‍हाडींना थिरकायला लावणारे ‘बॅण्डपथक’ म्हणून शिरपूर शहरातील ‘गोल्डन बॅण्ड’ ची ख्याती आहे.

दोन-तीन संगित साहित्याच्या जोरावर तुमडु नथ्थू बाशिंगे यांनी ‘जय शंकर बॅण्ड’ ची निर्मिती केली. १९५० पासून सुरू झालेल्या या पथकाचा प्रवास आता ‘गोल्डन बॅण्ड’ पर्यंत येऊन पोहचला आहे

. पथकाचा प्रवास तसा खडतरच.अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आपल्या भावंडाना सोबत घेऊन बाशिंगे यांनी ‘जय शंकर बॅण्ड’ पथक उभे केले. तुमडु बाशिंगे यांचा संगीतातील वारसा पुढे नेण्यासाठी त्यांचे जेष्ठ पुत्र दगडू बाशिंगे व त्यांचे दोघे भाऊ यांचे मोलाचे योगदान आहे.

खान्देशात अहिराणी गीते आणि पारंपरिक गीतांना अधिक महत्व आहे. त्याबरेबरच भक्तीगीते लोकप्रिय ठरतात. खान्देशवासीयांच्या सेवेसाठीच ‘जय माता दि ग्रुप व विन्स कंपनी’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डोंगर हिरवागार’ व ‘कसा करू शृंगार’ सारखे ऑडिओ आणि व्हिडिओ सीडीजचे संच त्यांनी उपलब्ध केले आहेत.

खान्देशचे आराध्यदैवत श्री सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी श्री क्षेत्र नांदुरी गड येथे सलग ४ ते ५ दिवसाचा पायी प्रवास करत हे पथक दरवर्षी संगीतमय पध्दतीने वाजतगाजत जात असते. सलग ११ वर्षांपासून त्यांचा हा उपक्रम सुरू आहे. यापुढेदेखील ही सेवा अविरत सुरू ठेवण्याचा संकल्प दगडू बाशिंगे आणि त्यांच्या चारही मुलांनी केला आहे.

आज गोल्डन बॅण्ड पथकाचे नाव संपूर्ण खान्देशभर असून राज्यात इतर ठिकाणीदेखील त्यांना विवाह सोहळ्यासाठी निमंत्रित केले जाते. त्यातून त्यांनी आपल्या कलेची छाप उमटविली आहे. आता खान्देशासह पुणे, परभणी, नाशिक, मालेगाव आदी भागासह मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यातही गोल्डन बॅण्ड पोहचला आहे. लग्न समारंभात गाण्यांच्या फर्माईश पूर्ण होतातच, पण गोल्डन बॅण्डचे पथक निवडक गाण्यांच्या तालावर वर्‍हाडींना ठेका धरायला भाग पाडतात.

dhule-kurayt-sada-munglam-logo

बाशिंगे आपल्या अनुभव विशद करताना सांगतात, ‘लग्नसमारंभातील वागणूक अगदी घरातील सदस्यांसारखीच मिळते. गोल्डन बॅण्ड पथकाचे नाते फक्त व्यावसायिक राहीलेले नसून भावनिकनाते तयार केले आहे. दिलेल्या शब्दाचे काटेकोरपणे पालन करण्यावर आमचा भर असतो. त्यामुळे वधु-वराकडील मंडळी आपुलकीने वागते. यापूर्वी स्वतःच्या दोन वेळच्या जेवणाचे वांदे व्हायचे. यासाठीच बाशिंगे परिवाराने बॅण्ड पथकाच्या माध्यमातून रोजगार शेधला. आज यात दुसरी पिढी वारसा चालवित आहे.

३० कलाकारांच्या हाताला रोजगार

सुरवातीला ५ ते ७ कलाकारांवर सुरु केलेली ही संगीतमय वाटचाल आत्ता २५ ते ३० कलाकारांपर्यंत येऊन पोहचली आहे. यापुढेही यात वाढ होत राहील असे सांगून गोल्डन बॅन्डचे संगीतकार तथा गायक दिनेश बाशिंगे म्हणाले, बॅण्डपथकातील कलाकार व बाशिंगे घराण्याचे तीन पिढ्यांपासून नाते आहे.

आता ४ थी पिढी संगीतक्षेत्रात येत आहे. कलेच्या माध्यमातून पथकाला राष्ट्रीय पातळीवर नेण्याचा मानस दिनेश बाशिंगे यांनी व्यक्त केला. शास्त्रीय संगीतात एक यशस्वी स्थान निर्माण करणार आहोत. अशीच अविरत सेवा यापुढेही देत राहू. विवाह सोहळ्यांमध्ये वर्‍हाडींच्या माध्यमातून खान्देशवासीयांचे खूप प्रेम मिळत असते. त्या प्रेमाचे आम्ही सदैव ऋणी आहोत, असे गोल्डन बॅण्ड पथकाचे मालक दिलीप बाशिंगे यांनी सांगीतले.

बॅण्डपथक एक कुटुंब असते. इतर अनेक कलाकारांना यातून रोजगार मिळालेला असतो. आम्ही चारही भावांनी स्वतःचाच विचार न करता वडिलोपार्जित व्यवसाय पुढे सुरु ठेवून इतर कलाकारांचा रोजगार कायम ठेवला आहे. गोल्डन बॅण्ड पथकातील कलाकारांच्या साथीनेच आज यश गाठले आहे. या यशात सहकारी कलाकारांचाही मोलाचा वाटा आहे, असेही मालक दिलीप बाशिंगे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*