चहाच्या पेल्यात सापडली नगरविकासाची वाट

0

रसिक ग्रुपचा पुढाकार, स्थापनादिनी चाँदबिबी महलावर ‘चाय पे चर्चा’

अहमदनगर (प्रतिनिधी)- पराभूत मानसिकतेमुळे इतके दिवस अडून बसलेला विकासाचा धावणार किमान इथल्या राज्यकर्त्यांना तशी स्वप्न तरी पडायला लागली आहेत. रसिक ग्रुपने पुढाकार घेत चहाच्या पेल्यातून ही नगरविकासाची वाट दाखविली आहे.
निमित्त होते रसिक ग्रुप आयोजित शहराच्या 527 व्या स्थापना दिनानिमित्त चाय पे चर्चा या कार्यक्रमाचे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत एक रंगलेला सोहळा मतमतांतरे आणि मनोगतातून साकार झाला.
याप्रसंगी आमदार संग्राम जगताप, महापौर सुरेखा कदम, डॉ.सुजय विखे, कोहिनूरचे प्रदीप गांधी, आमीचे अध्यक्ष, उद्योजक अशोक सोनवणे, पारसचेे पेमराज बोथरा, नगरसेवक सुवेद्र गांधी, मनपाचे विरोधी पक्ष नेते बाळासाहेब बोराटे, नगरसेवक बाबासाहेब वाकळे, मनिषा काळे, निखिल वारे, श्रीनिवास बोज्जा आादींची प्रमुख उपस्थिती होती.
सुवेद्र गांधी म्हणाले कि रेल्वे स्टेशनच्या सुशोभीकरणासाठी पाठपुरावा केल्यामुळे आपले स्थानक आदर्श बनले आहे. शहराचा औदयोगिक, सांस्कृतिक विकास करुन शहराचे नंदनवन व्हायला हवे.
बाळासाहेब बोराटे म्हणाले की,रस्ते,अंतर्गत गटारी व स्वच्छता या नागरीकांच्या मुलभूत गरजा असून हे काम दरजेदार व्हावे यासाठी मी प्रयत्नशील आहे.म्यु.कॉन्सिल हॉल च्या यनुतीनिकरणासाठी त्यांच्या निधीतून 10लाख रुपये देण्याचे त्यांनी जाहीर केले.
उद्योजक अशोक सोनवणे यांनी औदयोगिक क्षेत्रातील प्रश्‍नांचा उहापोह केला. पालिकेचे माजी शहर अभियंता एन.डी.कुलकर्णी यांनी नाटयगृह व ऐतिहासिक वास्तूच्या देखभालीसाठी आर्थिक तरतूद नाही. अ‍ॅड सतीशचंद्र सुद्रीक म्हणाले की, खेड्याचे शहराची ओळख निदान आता पुसून टाकायला हवी. यावेळी पत्रकार विजय होलम, डॉ. प्रकाश कांकरिया, सुधीर लांडगे, प्रमोद कांबळे, प्रा. मेधा काळे, डॉ. शारदा महांडुळे, अशोक काळे, अर्बन बॅकेचे संचालक अजय बोरा, पुष्कर तांबोळी, पवन नाईक, संभाजी गायकवाड, संतोष यादव, शिरीष बापट, प्रमोद मोहळे यांनी आपले विचार मांडले.
रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलुलकर यांनी उपस्थितांचे स्वागत आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. पत्रकार भूषण देशमुख यांनी नगर शहराच्या इतिहासाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले. अमोल बागुल यांच्या बासरी वादनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. यावेळी प्रमोद कांबळे यांनी रेखाटलेल्या चित्रातून नगरकरांना शुभेच्छा दिल्या. सत्कार सुदर्शन कुलकर्णी यांनी केला. संकेत होशिंग यांनी आभार मानले. कार्यक्रमास इंजि.इकबाल सय्यद, सुनिल चिंचिणे,प्रमोद कांबळे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाळासाहेब नरसाळे, समीर पाठक,तेजा पाठक,नंदकुमार येलूलकर, भास्करराव गायकवाड, ऋषीकेश येलूलकर,नंदकिशोर आढाव, कीर्ती नांदणीकर, तेजस अतीतकर, श्रीकृष्ण बारटक्के, प्रसन्न्न एखे,गजानन कुलकर्णी , संजय दळवी आदींनी परिश्रम घेतले.

नगर विकासांठी शहरातील विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग आसायला हवा. अनेक विकास कामे प्रगतीपथावर आहेत. तरुणांनी या प्रवाहात सामील व्हावे. शहराला विकासाच्या मोठ्या संधी आहेत. भविष्यात आपल्या शहराचा नावलौकिक उंचावेल यांची ग्वाही दिली.
– आमदार संग्राम जगताप

शहराचा विकास ही काळाची गरज आसून पर्यटन,औदयोगिक ,सांस्कृतिक विकास नगरकरांचे स्वप्न आाहे. आाजच्या चर्चचेतुन नगरकरांची शहराविषयाी आसलेली तळमळ दिसून अ ाली. शहराच्या प्रगतीसाठी नक्कीच प्रयत्न करेल असे आश्‍वासन दिले.
-महापौर सुरेखा कदम

  शहराचा विकास होण्यासाठी दुरदृष्टी गरजेची आहे. या ऐतिहासिक शहराला खर्‍या अर्थाने माझे ही निश्‍चितपणे सहकार्य असेल. आश्‍वासने देवून किंवा शासनाच्या निधीची अपेक्षा न करता जनतेच्या सर्वागीण विकासासाठी स्वतःहून पुढाकार घेणे आवश्यक आहे. शहरात अनेक प्रश्‍न आहेत. सर्वाना सोबत घेवून काम केले तर जनतेचे संपन्न शहराचे स्वप्न नक्कीच साकार होईल. मीदेखील यासाठी कटीबध्द राहील. शहरातील चौक सुशोभिकरण व इतर विकास कामांसाठी विखे परिवाराचे योगदान निश्‍चितपणे असेल. शहरातील एका चौकाचेे सुशोभिकरण करु.

-डॉ. सुजय विखे, अध्यक्ष-प्रवरा सहकारी साखर कारखाना

LEAVE A REPLY

*