घरकुल, जवाहर विहिर अपहार प्रकरणी सिन्नर पंचायत समितीला ठोकले टाळे

0

सिन्नर (प्रतिनिधी) दि. ४ : घरकुल, जवाहर विहीर अपहार प्रकरणी गुन्हे दाखल होत नसल्याने पांगरी ता. सिन्नर येथील भाऊसाहेब बैरागी यांनी अंगावर रॉकेल ओतून घेत पंचायत समितीच्या टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला.

पोलीस बळाचा वापर करून आपल्याला आंदोलन करू दिले जाणार नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी अंगावर रॉकेल ओतले.

सिन्नरचे पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या समोर गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी आज सायंकाळी 5 पर्यंत पांगरी अपहार प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची हमी दिली.

देशमुख यांनी शुक्रवारी दि.5 सायंकाळपर्यंत पंचायत समितीकडून गुन्हे दाखल न झाल्यास विस्तार अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्या विरुद्ध कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.

देशमुख यांचेवर विश्वास दाखवत बैरागी यांनी आंदोलन स्थगित केले. मात्र गुन्हे दाखल न केल्यास  दररोज पंचायत समितीला टाळे ठोकण्यात येईल असा इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

*