घनकचरा प्रकल्पासाठी 17 कोटीचा प्रस्ताव

0

जळगाव / आव्हाणे शिवारात गेल्या चार वर्षापासून घनकचरा प्रक्रिया प्रकल्प बंद आहे.

त्यामुळे शहरातील संकलित होत असलेला कचरा त्याठिकाणी साठवला जात असल्याने दुर्गंधी पसरु लागली आहे.

कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी नवीन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 16 कोटी 85 लाखाचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून लवकरच शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

महापालिकेने सन 2007 मध्ये हंजीर बायोटेक या कंपनीला जळगाव शहरातील कचर्‍यावर प्रक्रीया करण्याचा मक्ता दिला होता.

आव्हाणे शिवारातील 6 हेक्टर 53 आर क्षेत्र जागेवर प्रकल्प सुरु करण्यात आला होता.

मात्र जुलै 2013 मध्ये मक्तेदाराने येथील काम अचानक बंद केला. त्यामुळे मनपा प्रशासनाने हंजीर बायोटेक या कंपनीच्या व्यवस्थापनाविरुध्द फौजदारी गुन्हा देखील दाखल केला.

त्यानंतर महापालिकेचे नुकसान झाल्याने आयुक्तांना लवादक म्हणून प्राधिकृत करण्याचा निर्णय महासभेने घेतला होता. सुनावणीअंती आयुक्तांनी लवादक म्हणून मक्तेदार हंजीर बायोटेक यास 10 कोटी रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहे.

त्यानुसार वसुलीची नोटीस देखिल बजावली आहे. प्रशासनाने प्रकल्पाची जागा देखिल ताब्यात घेतली आहे.

त्यामुळे या जागेवर नवीन प्रकल्प उभारण्यासाठी प्रशासनाने निर्णय घेतला असून त्यासाठी 16 कोटी 85 लाख रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे.

LEAVE A REPLY

*