गुलाबजामचे पॅक-अप!

0

गुलाबजाम या चित्रपटाची घोषणा काहीच महिन्यांपूर्वी झाली होती.

सिद्धार्थ चांदेकरने या सिनेमाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करून आमच्या रेसिपीला सुरुवात झाली असे मार्चच्या सुमारास म्हटले होते आणि आता ही रेसिपी तयार झाल्याची घोषणादेखील त्यानेच सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे.

गुलाबजाम या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकरसोबत सोनाली कुलकर्णी, चिन्मय उद्गिरकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत तर हा चित्रपट सचिन कुंडलकरने दिग्दर्शित केला आहे.

या चित्रपटाचे चित्रीकरण पुण्यातील विविध भागांमध्ये झाले आहे.

चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यानचे फोटो कलाकार आपल्या सोशल मीडियावर अपलोड करत होते आणि त्यातूनच या चित्रपटाच्या चित्रीकरणाविषयी माहिती त्यांच्या फॅन्सना देत होते.

आता या चित्रपटाचे चित्रीकरण संपले असल्याचे सिद्धार्थ चांदेकरने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांना सांगितले आहे.

LEAVE A REPLY

*