गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांबद्दल हेमा मालिनी यांनी घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट

0

हेमा मालिनी यांनी गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली.

‘मथुरेत गुन्हेगारीच्या घटना इतक्या मोठ्या प्रमाणात वाढतील, याचा मी कधीच विचार केला नव्हता. मथुरा ही भगवान कृष्णाची नगरी असल्याने मी येथे आले होते. येथीस कणाकणात कृष्णाचे वास्तव्य आहे. मात्र आता मथुरेत कृष्णापेक्षा कंसांची संख्या जास्त आहे. पूर्वी असे नव्हते,’ असे भाजप खासदार हेमा मालिनी यांनी म्हटले. मथुरेतील सराफा बाजारात १५ मे रोजी दोन व्यापाऱ्यांची हत्या करण्यात आली होती. यावेळी कोट्यवधींचा ऐवजदेखील लंपास करण्यात आला. हत्या करण्यात आलेल्या दोन व्यापाऱ्यांच्या कुटुंबियांची हेमा मालिनी यांनी भेट घेतली. यावेळी हेमा मालिनी यांनी दोन्ही कुटुंबियांना न्याय मिळेल, असे आश्वासन दिले.

मथुरेतील कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावरुन हेमा मालिनी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. मथुरेतील व्यापाऱ्यांना अधिक सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी हेमा मालिनी यांनी योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली. ‘मी खासदार होण्यासोबतच एक स्त्रीदेखील आहे. त्यामुळेच या घटनेने मला दु:ख झाले आहे. या दुर्घटनेमुळे दोन्ही व्यापाऱ्यांच्या कुटुंबाचा आधार हिरावला गेला आहे. घटनेची माहिती मिळाल्यापासून मी पीडित कुटुंबियांच्या संपर्कात आहे,’ असे हेमा मालिनी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*