गळनिंब येथे जाळून घेतलेल्या कुलकर्णींचा अखेर मृत्यू

0

गुन्हा दाखल करण्यावरुन मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार

 

गळनिंब (वार्ताहर) – श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब या गावात प्रशासकीय यंत्रणेकडून अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरु होण्याअगोदरच काल कुलकर्णी या इसमाने स्वतःला जाळून घेतले. यात या इसमाचा मृत्यू झाला असून शवविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला. एकमेकांवर गुन्हे दाखल करण्यावरुन काल संध्याकाळपर्यंत त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले नव्हते.

 
गळनिंब येथील अतिक्रमण काढण्याबाबतचा वाद अनेक वर्षापासून सूरु होता. मात्र काल अखेर प्रशासकीय यंत्रणेने सर्व तयारीनिशि अतिक्रमण काढण्यासाठी सज्ज झाले होते. मात्र येथील अनिल अंबादास कुलकर्णी याने घर बंद करुन स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून स्वतःला जाळून घेतले यामुळे गावात याला वेगळेच वळण लागले. त्याला तातडीने प्रवरानगर ट्रस्टच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते

 

मात्र सुमारे 20 तासाच्या उपचारानंतर त्यांचा मृत्यू झाला. मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. प्रशासकीय अधिकार्‍यांविरुध्द गुन्हा दाखल करावा अशी मागणी नातेवाईकांनी केली तर अधिकार्‍यांनी अनिल कुलकर्णी व त्यांच्या पत्नीविरुध्द गुन्हा दाखल करण्याबाबत आग्रही होते हा वाद लोणी पोलीस ठाण्यात गेला. या वादात हा मृतदेह मध्येच अंत्यसंस्काराविना ठेवावा लागला. यामुळे गावात वेगळेच वातावरण तयार झाले. गावात तणाव निर्माण झालेला होता.

 

त्यामुळे गावात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी अप्पर पोलीस अधिक्षक़ रोहिदास पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. गलांडे पोलीस उपनिरीक्षक श्री. शिंदे हे या घटनेवर नजर ठेवून होते. याप्रकरणी सुरुवातीला ग्रामसेवक अमोल भगवान साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अनिल अंबादास कुलकर्णी, व त्यांची पत्नी सौ. कुलकर्णी यांचेविरुध्द भादंवि कलम 309, 114 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

LEAVE A REPLY

*