गर्भलिंग निदान प्रकरणी मालेगावच्या डॉक्टरना कारावासाची शिक्षा

0

मालेगाव, ता. १५ : गर्भलिंग निदान केल्याप्रकरणी मालेगावच्या अभिजित देवरे यांना ३ वर्षे कारावास व ७  हजार रुपये दंड, तर डॉ. सुमीत देवरे यांना ६ महिने कारावास आणि ७ हजार रुपये दंड, तसेच वैद्यकीय परवाना रद्द करण्याची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.

संबंधित डॉक्टर हहे कँम्परोड येथील सीताबाई हॉस्पिटलच्या माध्यमातून शिवमंगल सोनोग्राफी केंद्रात अवैध गर्भलिंग निदान करत असल्याचे सिद्ध झाले होते.

यासंदर्भात आलेल्या तक्रारीनंतर पोलिस व प्रशासनाने स्टिंग ऑपरेशन करून २० जुलै १३ ला हा गुन्हा उघडकीस आणला होता. त्यानंतर संशयितांवर खटला चालून आज त्यांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली.

LEAVE A REPLY

*