गडद येथे श्रमदानातून बंधारा

0

नवापूर / वनवासी ऊत्कर्ष समितीसारख्या स्वयंसेवी संस्थानी ग्रामस्थांमध्ये श्रमदान व लोकसहभागाचे महत्व पटवून उभी केलेली लोकचळवळ ही कौतुकास्पद आहे.

विकासासंबंधी येथील जनतेमध्ये सकारात्मक भाव असून आगामी काळात गडद गावास नवापूर तालूका हा आदर्श तालूका होईल,

असा विश्वास व्यक्त करीत लोकसहभागातून उभ्या राहणार्‍या कामांना सर्व शासकीय विभागांनी तत्परतेने सहकार्य करण्याची सुचना जिल्हाधिकार्‍यांनी उपस्थित अधिकार्‍यांना केली.

जलस्त्रोत संवर्धनातुन उभ्या राहणार्‍या कामातुन विविध प्रकारचे पूरक व्यवसाय निर्माण होवून स्थानिक पातळीवर रोजगाराची संधी वाढून आर्थिक स्तर उंचावण्यासदेखील मदत होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले.

त्याचाच एक भाग म्हणुन सदर नदीवर श्रमदानातुन गॅबियन बंधारा व सेवावर्धिनी पुणेच्या प्रयत्नाने ऍटलास कोपकोच्या सी.एस.आर. सहयोगातुन बांधावयाच्या सिमेंट बंधार्‍याच्या भुमिपुजन सोहळा गडद येथे घेण्यात आला.

श्रमदानाला सूरवात करण्यापुर्वी उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांनी जलप्रतिज्ञा घेतली.

 

LEAVE A REPLY

*