ख्वॉजामियॉ झोपडपट्टीच्या जागेवर स्थलांतराची प्रक्रिया

0

जळगाव / ख्वॉजामियॉ झोपडपट्टीच्या जागेवर तात्पुरत्या स्वरुपात हॉकर्सला स्थलांतरीत करण्याबाबत महासभेने ठराव केला आहे.

या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने प्रक्रिया सुरु केली असून 782 हॉकर्सला जागा निश्चित करण्यासाठी दि.12 रोजी सोडत काढण्यात येणार आहे.

त्यानंतर दि.15 रोजी प्रत्यक्ष जागेवर स्थलांतरीत करण्यात येणार असल्याची माहिती अतिक्रमण अधीक्षक एच.एम. खान यांनी दिली.

बळीरामपेठ, सुभाष चौक, शिवाजी रोडवरील हॉकर्सला स्थलांतरीत करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहे.

काही महिन्यापुर्वी हॉकर्सला न्यु बी.जे. मार्केट परिसरातील पर्यायी जागेवर स्थलांतरीत करण्यात आले होते. परंतु पर्यायी जागेवर व्यवसाय न करता मूळ जागेवरच व्यवसाय सुरु आहे.

परिणामी वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने प्रशासनातर्फे अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई देखील सुरु होती. या कारवाईत वाद उद्भवल्याने आणि वारंवार वाद निर्माण होवून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता.

त्यामुळे ख्वॉजामियॉ झोपडपट्टीच्या जागेवर तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरीत करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी महासभेत ठराव देखील करण्यात आला.

त्याअनुषंगाने ख्वॉजामियॉ झोपडपट्टीच्या जागेवर जेसीबीच्या साह्याने सपाटीकरण करण्यात आले.

 

LEAVE A REPLY

*