खून प्रकरणी एकास जन्मठेप ; पंचशीलनगर येथील घटना

0

पंचशीलनगर : येथील लोटे खून प्रकरणी जल्हा व सत्र न्यायाधीश एस़सी़ शर्मा यांनी आज अरोपीस जन्मठेप व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़. चरण नाथा उजागरे (21, समतानगर, आगरटाकळी रोड, नाशिक) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

नाशिक -पुणे रोडवरील पंचशीलनगरमधील सुजीत शाम लोट (19, पंचशील क्लासिक अपार्टमेंट, शिवाजीनगर नाशिक पुणा रोड) या युवकाचा दोन वर्षापुर्वी जुन्या भांडणाच्या कारणावरून चाकूने वार करून उजागरे याने खून केला होता. ही घटना एप्रिल 2015 मध्ये घडली होती.

मयत सुजीत शाम लोट याने घटनेच्या काही दिवसांपुर्वी आरोपी चरण उजागरे यास चापट मारली होती़ त्याचा राग उजागरेच्या मनात होता़ 11 एप्रिल 2015 रोजी सायंकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास सुजीत शाम लोट व त्याचा मित्र राजू बाबुराव दाणी हे टाकळीरोडवरील टपरीवर सिगारेट पित असताना उजागरे तिथे आला़ याच ठिकाणी सुजीतचा भाऊ पवन अशोक लोट यास फोन करून बोलावून घेण्यात आले होते़.

या टपरीवर लोट व उजागरे यांच्यामध्ये जोरदार भांडण सुरू असतानाच उजागरेने हातातील चॉपरने सुजीत लोटच्या छातीवर व पोटावर सपासप वार केले व दुचाकीवरून पळून गेला़ यानंतर पवन लोट व राजु दाणी यांनी सुजीतला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले होते. परंतु तत्पुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी घोषीत केले होते़ या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात चरण उजागरेविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़.

न्यायाधीश शर्मा यांच्या न्यायालयात हा खून खटला सुरू होता. या खटल्यात साक्षीदार व प्रत्यक्षदर्शींनी दिलेली साक्ष व समोर आलेले पुरावे ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी चरण उजागरे यास जन्मठेप व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारी वकील म्हणून शिरीष कडवे यांनी काम पाहिले त्यांनी बारा साक्षीदार तपासले़

LEAVE A REPLY

*