खाशाबा जाधव युवा राज्यस्तरीय कुस्तीसाठी जिल्हा संघाची निवड

0

वाडिया पार्क क्रीडा संकुल येथे निवड चाचणीत जिल्ह्यातील मल्लांची हजेरी

अहमदनगर (प्रतिनिधी)- कुस्ती ऑलंम्पिक पदक विजेते कै.खाशाबा जाधव तीसरी युवा (ज्युनिअर) फ्रीस्टाईल व ग्रीकोरोमन राज्यस्तरीय अजिंक्यद कुस्ती स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्हा तालीम संघाची निवड चाचणी वाडियापार्क क्रीडा संकुलात घेण्यात आली.

या निवड चाचणी स्पर्धेत जिल्ह्यातील मल्लांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने तर वाशीम जिल्हा तालीम संघाच्या वतीने रविवार दि.28 मे ते मंगळवार दि.30 मे दरम्यान वाटाणे (जि.वाशीम) येथे होणार्‍या कै.खाशाबा जाधव युवा राज्यस्तरीय अजिंक्यद कुस्ती स्पर्धेसाठी जिल्ह्यातील पैलवानांची निवड चाचणी घेण्यात आली. अहमदनगर जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष पै.वैभव लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर निवड चाचणी पार पडली.

प्रारंभी जिल्हा तालिम संघाचे खजीनदार पै.नाना डोंगरे यांच्या हस्ते निवड चाचणी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष पै.रामभाऊ लोंढे, उपाध्यक्ष रामभाऊ नळकांडे, गोरख खंडागळे उपस्थित होते. पंच म्हणून पै.हंगेश्‍वर धायगुडे, पै.गणेश जाधव, पै.मनोज शिंदे यांनी काम पाहिले. निवड झालेल्या संघाचे व्यवस्थापक म्हणून पै.नाना डोंगरे काम पाहत आहे.

कै.खाशाबा जाधव युवा राज्यस्तरीय अजिंक्यद कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेल्या मल्लांची यादी पुढीलप्रमाणे:-
फ्रीस्टाईल- 50 किलो वजनगट- बुध्दभुषण साळवे (ता.नगर), 55 किलो वजनगट- सुशांत भुजबळ (पारनेर), 60 किलो वजनगट- अक्षय उघडे (ता.नगर), 66 किलो वजनगट- चंदर पालवे (श्रीगोंदा), 74 किलो वजनगट- राधेश खरमाळे (पारनेर), 84 किलो वजनगट- सुभाष गाढवे (नगर शहर), 96 किलो वजनगट- विष्णू खोसे (पारनेर), 96 किलो ते 120 किलो खुला वजनगट उमेश पवार (पाथर्डी) ग्रीकोरोमन- 50 किलो वजनगट- ओमकार मुरकुटे (श्रीगोंदा), 60 किलो वजनगट- अजय चव्हाण (जामखेड), 66 किलो वजनगट- विकास गोरे (ता.नगर), 74 किलो वजनगट- ऋषीकेश भालसिंग (नगर शहर), 84 किलो वजनगट- शिवराज कार्ले (ता.नगर), 96 किलो वजनगट- विशाल आढाव (श्रीगोंदा), 96 ते 120 किलो खुला वजनगट- शुभम गिरवले (ता.नगर)

LEAVE A REPLY

*