क्रेन अंगावर पडून तीन कामगारांचा मृत्यू, इचलकरंजीमधील सांगवडे गावातील घटना

0

कोल्हापूरातील इचलकरंजीमधील सांगवडे गावात विहीर खोदकाम सुरु असताना सांगवडे गावात शुक्रवारी सकाळच्या दरम्यान विहिरीचे खोदकाम काम सुरु असताना अंगावर क्रेन पडून तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये एक कामगार जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या दुर्घटनेत बाबुराव वडर (वय ५४), रामचंद्र साळवी (वय ४५), भैय्यालाल माळी (वय ३५) या कामगारांचा मृत्यू झाला. तर शिवाजी पवार हा कामगार गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरु असल्याचे समजते.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

अपघात नक्की कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेल नाही.

LEAVE A REPLY

*