कोळगावच्या सेंट्रल बँके समोर ठिय्या

0

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील सेंट्रल बँकेच्या शाखेत ग्राहकांना चांगली सेवा मिळत नसल्याच्या निषेधार्थ पंचायत समिती सभापती पुरुषोत्तम लगड यांनी ग्रामस्थांसह बँकेच्या शाखेसमोर धरणे आंदोलन केले.

 

 

श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव हे अतिशय मोठे गाव आहे. या गावाशी अनेक गावांचा संपर्क येतो. या गावातील नागरिक बँकेच्या व्यवहारासाठी कोळगाव येथील शाखेत येतात. मात्र येथील शाखेत कधीच ग्राहकांना वेळेवर सेवा मिळत नाहीत. येथील कर्मचारी ग्राहकांशी व्यवस्थित चर्चा करीत नाहीत. ग्राहकांच्या प्रश्नाला उत्तरे दिली जात नाहीत.

 

 

ग्राहकांना स्वतःचे पैसे बँकेत असताना देखील काढता येत नाहीत. नेहमीच इंटरनेटचा बिघाड होतो. नेहमी प्रिंटर बंद असते. बँकेच्या ग्राहकांना जागा अपुरी पडत आहे. कर्मचारी अपुरे आहेत. पीक कर्ज, मुद्रा कर्जा बाबत बँकेत अडवणूक केली जाते. या सर्व बाबींचा निषेध म्हणून पंचायत समिती सभापती पुरुषोत्तम लगड यांनी नितीन नलगे, शरद लगड, पांडा मेहेत्रे, दत्तात्रय लगड, विलास शितोळे, जयराज लगड, नितीन मोहरे, महेश लगड, किरण लगड आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

बँकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी कारभाराबाबत लवकरच सुधारणा केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

 

 

LEAVE A REPLY

*