कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टवर नवीन विश्‍वस्त नेमण्याचे आदेश

0

औरंगाबाद खंडपीठाचा निकाल

 

कोल्हार (वार्ताहर)- कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टवर 2 महिन्यांत नवीन विश्‍वस्तांची निवड व नियुक्ती करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधिश व्ही.के.जाधव यांनी सहाय्यक धर्मादाय आयुक्ताना दिले. नवीन विश्‍वस्त मंडळ नेमणूक होईपर्यंत विद्यमान विश्‍वस्त मंडळ कामकाज पाहणार आहे.

 

 

कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टच्या विश्‍वस्त मंडळाची मुदत संपल्यामुळे तसेच ट्रस्ट संदर्भात अन्य अपिल व याचिका न्यायालयात दाखल होत्या. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने दाखल झालेल्या सर्व याचिकांवर सुनावणी करताना हा निकाल दिला.

 

 

न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे, नवीन विश्‍वस्त मंडळातील विश्‍वस्तांची संख्या 11 ऐवजी 15 करण्यात यावी. त्यापैकी 8 विश्‍वस्त कोल्हार बुद्रुकचे तर 7 विश्‍वस्त भगवतीपूर गावाचे असतील. नवनियुक्त विश्‍वस्त मंडळाच्या पहिल्या बैठकीत बहुमताने अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि खजिनदार यांची निवड करण्यात यावी.

 

 

त्यांचा कार्यकाळ विश्‍वस्त मंडळाच्या कार्यकाळानुरुप ठरविण्यात यावा. सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांनी सदर आदेश मिळाल्यापासून दोन महिन्यांच्या कालावधीत विश्‍वस्त मंडळाची रितसर निवड व नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत.

 

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आवाहनानुसार दोन्ही गावांचा सामाजिक सलोखा राहावा म्हणून सर्व सहमतीने याचिका मागे घेण्यात आल्या. त्यामुळे नवीन विश्‍वस्त मंडळ निवडीचा मार्ग सुकर झाला. सर्वांनी सामंयस्याची भूमिका घेतली.
– डॉ. भास्करराव खर्डे, सल्लागार, देवालय ट्रस्ट

 

सध्याच्या विश्‍वस्त मंडळाची मुदत संपल्यामुळे काहींनी न्यायालयात याचिका दाखल केलेली होती. अन्य काही याचिकांबरोबरच 2003 सालचे एक अपिल प्रलंबीत असल्याने निकाल दिला जात नव्हता. न्यायालयाने सर्व याचिकांची एकत्रित सुनावणी घेऊन वरील आदेश धर्मादाय आयुक्तांना दिले आहेत.
– अ‍ॅड. सुरेंद्र खर्डे, विश्‍वस्त, देवालय ट्रस्ट

LEAVE A REPLY

*