कोलकत्ता : सुप्रीम कोर्टाच्या 8 न्यायाधीशांना शिक्षा

0

कोलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी. एस. कर्नन यांनी सरन्यायाधीश जे.ए.खेहर यांच्यासह इतर सात न्यायमूर्तींना पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

कर्नन यांनी या न्यायाधींशाविरोधात अॅट्रोसिटी आणि सुधारणा कायदा 2015 नुसार खटला भरला होता.

आठ न्यायाधीशांनी संयुक्तपणे 1989 सालचा अनुसूचित जाती-अनुसूचित जमातींवरील अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि 2015 च्या कायद्याअंतर्गत दंडनीय अपराध केला असल्याचं कर्नन यांनी म्हटलं आहे.

जस्टिस कर्नन यांनी सुप्रीम कोर्टाच्या 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाचं नाव घेतलं, ज्यामध्ये मुख्य न्यायाधीश जे. एस. खेहर, जस्टिस दीपक मिश्रा, जस्टिस जे. चेलमेश्वर, जस्टिस रंजन गोगोई, जस्टिस मदन बी लोकूर, जस्टिस पिनाकी चंद्र घोष आणि जस्टिस कुरियन जोसेफ यांचा समावेश आहे.

आठही न्यायाधीशांना अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम, 1989 अन्वये शिक्षा देण्यात येईल.

 

त्यांनी जातीय भेदभाव केला आहे. शिवाय त्यांना एका सार्वजनिक संस्थेत आपला अपमान केला आणि एका दलित न्यायाधीशाचा छळ केला, असं कर्नन यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

*