कोरड्या विहिरीत शेतकर्‍याचे उपोषण सहाव्या दिवशीही सुरूच

0

कोतूळ (वार्ताहर) – मन्याळे येथे विषाची बाटली घेऊन कोरड्या विहिरीत उपोषणाला बसलेले बहिरुनाथ जाधव यांच्या उपोषणाचा काल शुक्रवारी सहावा दिवस होता . प्रशासनाने उपोषण मिटवण्याचा प्रयत्न करूनही त्याला यश आले नाही
दरम्यान यशोमन्दिर पतसंस्थेचे पदाधिकारी व प्रशासनाने काल कर्जदार श्री जाधव यांचेशी चर्चा केली पण उपोषणार्थी जाधव यांनी कर्ज देताना अन्याय झाला आहे दोषींवर कारवाई करावी व कर्जमाफ करावे हि मागणी लाऊन धरली यामुळे यावर निर्णय झाला नाही.

 
काल अकोले बसस्थानका समोर या प्रश्नावर शिवसेना,मराठा महासंघ,संभाजी ब्रिगेड यांचेसह कार्यकर्ते यांनी रस्ता रोको आंदोलन केले यामुळे बहिरु नाथ जाधव यांच्या कर्ज माफीचा प्रश्न व्यापक बनला आहे. बहिरु नाथ जाधव हे विहिरीत उपोषण चालू असताना सापाने कालही दर्शन दिले या वरून विहिरीत सापांचे वास्तव्य असल्याचे दिसून आले.

 
दरम्यान उपोषण कर्ते जाधव यांनी आज शनिवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या आत प्रश्न मार्गी न लागल्यास औषध प्राशन करणार असल्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.

 
चौकट-शासनाने मन्याळे येथे विहिरीत उपोषणास बसलेले शेतकरी भैरवनाथ जाधव यांचेसह राज्यातील शेतकर्‍यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे अशी मागणी मराठा महासंघाचे प्रदेश सरचिटणीस संभाजीराजे दहातोंडे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

*