केळी व अंडे एकत्र खाल्याने मृत्यू?

0

सोशलवर अफवेचा पेव फुटल्याने नागरिकांमध्ये संभ्रम कायम

 

अहमदनगर (प्रतिनिधी)- केळी व अंडे एकाचवेळी खाल्याने एका माणसाचा मृत्यू झाला, असा संदेश व व्हीडीओ व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ व संदेश अर्धवटच दिला जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. केळी व अंडे खाल्याने मृत्यू होत असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून फेसबुक, व्हॉटसअ‍ॅप, हाईक, ट्विटर आदी सोशल अ‍ॅपवर केळी व अंड्डे एकाच वेळी खाल्याने एका माणसाचा मृत्यू झाल्याचा व्हीडिओ व संदेश व्हायरल केला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झालेले असून सकाळी जरी घरात कोणी केळी खालली असेल तर त्याला संध्याकाळी अंड्डी खाऊन दिली जात नाही.

 
या व्हीडीओचा सर्वसामान्यांबरोबरच राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांनीही केळी व अंड्डीचा चांगलाच धसका घेतला आहे. त्यांना सोशल मीडियावर आलेल्या संदेशाची खात्री करून घेत आहे. पण ही खात्रीच एकमेकांच्या मनात आता भीती वाढवित आहेत.
विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून जो व्हिडीओ व्हायरल केला जात आहे. तो अर्धवट आहे. त्यामध्ये डॉक्टरची प्रतिक्रिया काढून टाकून तो व्हीडिओ व्हायरल केला जात आहे. हा व्हीडिओ अनेकांनी आपल्या फॅमिली डॉक्टरांना पाठवून त्यावर माहिती घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर संबंधितांकडून व्हीडिओ अर्धवट आहे. त्यात जी डॉक्टरांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. ती काढून टाकण्यात आलेली आहे. त्यामुळे हा व्हीडिओ फक्त अफवा पसरविणार आहे.
केळी व अंडी एकाच वेळी खालल्यानंतर मृत्यूही झाला असेल पण तो मृत्यू नेमका यामुळे झाला, असा तर्क काढणे चुकीचे आहे. त्याने केळी व अंडी खाण्याच्या अगोदर व नंतर काही खाले का? त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे शविच्छेदन झाले का? त्याचा अहवाल कोणाकडे आहे, याची माहिती कोणाकडेच नाही एकाने पाठविला म्हणून आपण दुसर्‍याकडे हा व्हिडीओ पाठवित आहे. ही पध्दत चुकीची आहे.
सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट व्हायरल करताना काळजी घेणे महत्वाचे आहे. विशेष म्हणजे आरोग्य विषयक असणारेे संदेश पाठविताना खबरदारी घ्यायला हवे. परंतु आपल्याकडे तसे होत नाही. ही चुकीचे पध्दत आहे. त्यामुळे निरर्थक चर्चांना आपल्याकडे वाव मिळतो.
‘संडे हो या मंडे.. रोज खाओ अंडे’… दूरचित्रवाणीवरील ही जाहिरात अंड्याचे आरोग्यदायी महत्त्व पटवून देते. अंड्यांचे दररोजचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच रोज सकाळी केळी खाल्ल्यास दिवसभरात त्रास देणारी अ‍ॅसिडिटी, डोकेदुखी, अपचन व, ब्लोटिंगपासून आपल्याला आराम मिळू शकतो.

 

  केळी व अंडे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. परंतु केळी जर केेमीकलच्या साह्याने पिकविलेली असेल तर ती आरोग्यास हानीकारक आहे. केमीकलने पिकविलेली केळी व अंडी खाणे एखाद वेळी अपायकारक ठरू शकते. त्यामुळे प्रत्येकाने केळी खरेदी करताना केमीकलने पिकविलेली केळी खरेदी करू नये, असा सल्ला वैद्यकीय सूत्रांनी दिलेला आहे.

 

अंडी व केळी एकत्र खाण्याबाबत बाबतची मते संशोधकांनी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे ती सत्य की असत्य आहेत, खाण्यात त्याचे किती प्रमाण असावे, हे प्रत्येकाने आपल्या फॅमिली डॉक्टरकडून जाणून घेणे महत्वाचे आहे. ऊस गोड लागला की मुळा सकट खाऊ नये, ही म्हणी प्रमाणे आरोग्यास चांगले आहे, हे म्हणजे किती खाऊ नये, त्याचा परिणामाऐवजी दुष्परिणाम होतो. अंडी व केळी एकाच वेळी खाल्याने त्याने मृत्यू होतो. या व्हिडीओने संशोधकांना काही वेळासाठी चक्रावले होते. त्यांचाही या दृष्टीने अभ्यास करून एकदा झाला आहे.

 

राज्यातील काही शहरांमध्ये पॅस्टिकची अंडी विक्रीस आल्याची वंदता आहे. त्याचा बोलबाला सोशल मीडियावर चांगलाच झालेला आहे. त्याकडील लक्ष विचलीत करण्यासाठी अंडी व केळी खाल्याने माणसाचा मृत्यू झाल्याची माहिती व्हायरल केली जात असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

 

सोशल मीडियावर अंडी व केळी खाल्याने माणसाचा मृत्यू झाल्याचा व्हीडिओ व संदेश व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व संदेशात कुठले तथ्थ नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. अंडी व केळी आरोग्यासाठी चांगली आहे. पण ती खाता किती खावे, यालाही बंधन आहे.
– डॉ. बापूराव नागरगोजे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.

LEAVE A REPLY

*