केदार शिंदेंचा आगामी सिनेमा ‘रायबाचा धडाका’ लवकरच रसिकांच्या भेटीला

0

केदार शिंदे यांचा नवीन मराठी सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे.

‘रायबाचा धडाका’ या सिनेमातून केदार शिंदे एक नवी जोडी रसिकांच्या भेटीला घेऊन येत आहे.

‘आल्हाद अंडोरे’ आणि ‘राधिका’ अशी या कलाकारांची नावं आहे.

केदार शिंदे यांनी शोधून काढलेली ही जोडी आगामी काळातील सुपरस्टार अशी जोरदार चर्चा सध्या ऐकायला मिळत आहे. रायबाचा धडाका या सिनेमातील आल्हाद आणि राधिकाच्या लूकबाबतही सध्या कमालीची गुप्तता पाळली जात आहे. हे दोघंच नाही तर त्यांच्या सहकलाकारांविषयीसुद्धा फारसं ऐकायला मिळत नाही. लवकरच याचा खुलासा करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

‘रायबा’ आणि ‘शुभ्रा’ यांच्या प्रेमाची कथा या सिनेमात पाहायला मिळणार आहे. हलकीफुलकी आणि रसिकांना हवीहवीशी तसंच सा-या कुटुंबासह पाहता येईल अशी या सिनेमाची कथा असणार आहे

LEAVE A REPLY

*