केजरीवालांच्या विरोधातील पुरावे फक्त सीबीआयलाच सांगणार : कपिल मिश्रा

0

माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी मंगळवारी सकाळी पुन्हा पत्रकार परिषद बोलावली.

या परिषदेत त्यांनी केजरीवाल यांच्या विरोधात आणखी एका प्रकरणाचे सबळ पुरावे असल्याचा दावा केला. यासोबत, नवीन आरोपांचे पुरावे आणि खुलासा केवळ सीबीआयपुढे मांडणार असे मिश्रा यांनी स्पष्ट केले.

कपिल मिश्रा यांनी ट्वीट करून लवकरच 3 एफआयआर दाखल करणार असे सांगितले.
– पहिला एफआयआर केजरीवाल आणि सत्येंद्र जैन यांच्यातील कथित 2 कोटींच्या व्यवहारांवर
– दुसरे एफआयआर केजरीवालांच्या नातेवाईकांना जमीन मिळवून दिल्याबद्दल जैन यांच्या विरोधात असणार आहे.
– तिसरे एफआयआर सत्येंद्र जैन, आशिष खेतान, राघव चंद्रा, संजय सिंह आणि दुर्गेश पाठक यांच्या विरोधात फाडला जाणार आहे.
या लोकांनी परदेशवारीसाठी चुकीच्या पद्धतीने निधी वापरला असा आरोप मिश्रा यांनी लावला आहे.

अरविंद केजरीवाल यांनी वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी संध्याकाळी एक उच्चस्तरीय बैठक बोलावली. याच बैठकीत मिश्रा यांना शिस्तभंग केल्याच्या आरोपावरून पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*