कुसुमाग्रजांमुळे जुळले नवनीत आणि नाशिकचे अनोखे नाते

0

मुंबई, दि. 16 (प्रतिनिधी) – शालेय पुस्तकांच्या विश्वातील प्रख्यात नाव आहे ते नवनीत या प्रकाशन संस्थेचे. कोणत्याही इयत्तेतील शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक पुस्तकं हवं असेल तर नवनीतला पर्याय नाही असा ठाम विश्वास पालकांना वाटावा, शिक्षकांनी या विश्वासाला योग्य म्हणावे इतका जम या व्यवसायात केवळ नवनीतनचे बसवला.

गाला परिवारातील तीस पस्तीस सदस्य आज हा व्यवसाय अन्य सहकार्‍यांसह सांभाळतात. जितुभाई गाला हे या संस्थेचे प्रमुख. आज पंचाहत्तरीत आले तरी गालासाहेब सकाळी नऊ वाजता कार्यालयात हजर होतात.

स्वतः सर्व व्यवसायावर लक्ष ठेवतात. ते सांगतात की नवनीतचे बालवर्गात आजही लोकप्रिय असलेले पुस्तक आहे अक्षरबाग. त्याचे लेखन विख्यात कविवर्य लेखक वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रजांनी केलेले आहे हा आमच्या सार्थ अभिमानाचा विषय आहे.

तात्यासाहेबांचा निखळ स्नेह मला लाभला, असे सांगून जितुभाई म्हणतात त्यात व्यावसायिकता नव्हतीच. ती निखळ मैत्री होती. तात्यासाहेबांच्या भेटीसाठी मी प्रत्येक आठवड्यात शनिवारी वा रविवारी नासिकला पोचत असे. स्वतः गाडी चालवत पहाटे निघालो की चार तासात नासिक गाठता येत होते. तात्यांकडे तीन चार तास बसले की त्या नासिक भेटीचे सार्थक होतं असे.

पण त्यांचा माझा स्नेह हा निखळ राहिला. त्याला व्यावसायिक धुमारे नव्हते. त्यांचा माझा स्नेह पाहून त्यामुळे माझे मुंबईतील अनेक प्रकाशक मित्र मागे लागायचे की आम्हाला त्यांच्याकडे घेऊन जा, एखादं पुस्तक ते आम्हाला लिहून देतील का ते सांग. पण आमच्या मैत्रीत व्यवसायाचे ताण तणाव कधीच येऊ नमेत अशीच माझी इच्छा होती व म्हणूनच मी त्या प्रकाशक मित्रांकडे नेहमीच दुर्लक्ष्य केले.

जितूभाईंचे आणखी एक वैशिष्ठ्य आहे ते त्यांच्या संग्रही असणारी जुन्या मुंबईची चित्रमय आठवण. ब्रिटिशकालीन आणि स्वातंत्र्याच्या पहाटेपर्यंतच्या काळातील मुंबई अत्यंत अनोखी देखणी आणि निराळीच होती. ही मायानगरी, कुबेराची नगरी होती. आता आपण कल्पनाही करू शकत नाही अशी ती मोकळी आणि स्वच्छ देखणी अशी नगरी होती.

त्या जुन्या जमान्यातील मुंबईचे फोटोग्राफ जितूभाईंनी जपून ठेवले आहेत, जतन केले आहेत. व्हिटी परिसरात फिरणार्‍या घोड्यागाड्या, फौंटनचा हुतात्मा चौक झाला नव्हता त्या काळात तिथे फिरणार्‍या ट्रामगाड्या, मरीन ड्राईव्हची अनोखी दृष्ये, धोबीतलाव आणि गोवालिया टँक म्हणजे खोरखरीचे भव्य तलाव होते त्याची छायाचित्र असा एक मोठा संग्रह त्यांनी गोळा केला आहे.

त्यांच्या दालनात अशी जुन्या मुंबईची अनेक दृष्मे टांगलेली तर आहेतच पण तिथेच एका बाजूला अनेक मोठ्या मोठ्या फे्रमनीट रचून ठेवलेल्याही दिसतात. त्यातील एक दोन काढून ते अभिनमाने दाखवतात. दिनोडिया नावाचा त्या काळातील एका विख्यात छायाचित्रकाराच्या त्या कलाकृती आहेत. जुन्या मुंबईचा इतिहास जपणार्‍या या सार्‍या फोटोंचे तुम्ही काम करणार? असे म्हटल्यावर जितूभाई हसत सांगतात की हा माझा पुढचा पेट प्रोजेक्ट आहे.

असे शंभर अनोखे आणि अप्राप्य फोटो मी जपून ठेवलेले आहेत. एका पानावर एक मोठा फोटो छापणार आणि त्याच्या बाजूच्या पानावर फोटोत दिसणार्‍या दृष्यावरचे तज्ज्ञ संशोधकांचे भाष्य, माहिती घेणार असा एक अनोखा पुस्तकाचा नजराणा मुंबईकरांना तसेच अभ्यासकांना मला भेट द्यायचा आहे.

 

LEAVE A REPLY

*