कुलभूषण जाधव यांना इराणमधून अटक; माजी आयएसआय अधिकाऱ्याचा दावा

0

पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमधून नव्हे, तर इराणमधून अटक करण्यात आली होती, अशी कबुली आयएसआयमधून लेफ्टनंट जनरल पदावरुन निवृत्त झालेल्या अमजद शोएब यांनी दिली आहे.

त्यामुळे पाकिस्तानच्या दाव्यातील फोलपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.

कुलभूषण जाधव प्रकरणी भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली आहे.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या स्थगिती दिली आहे.

आता न्यायालयातील पुढील सुनावणीत भारताला अमजद शोएब यांच्या विधानाचा वापर करता येऊ शकेल. त्यामुळे जगासमोर पाकिस्तानच्या खोटारडेपणा उघड होईल. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव प्रकरणात भारताला दिलासा दिला आहे.

LEAVE A REPLY

*