कुंपणाच्या तारेत वीजप्रवाह; आठ शेळ्या दगावल्या

0

निघोज (वार्ताहर) – पारनेर तालुक्यातील निघोज येथील व्यावसायिक किसन कान्हू शेटे यांच्या शेळीपालन गोटफॉर्मच्या कुंपणाच्या तारेत वीजप्रवाह उतरल्याने सुमारे 8 शेळ्या चिकटून मृत्युमुखी पडल्या. यात एक लाख 44 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

 
शेटे यांच्या घराजवळच शेळीपालन व्यवसायासाठी शेड व त्याभोवती तारेचे कुंपण आहे. मात्र घरातील वीज प्रवाहासाठी आर्थिंग देण्यासाठी लावलेल्या तारेतून कुंपणाच्या तारेत वीजप्रवाह उतरला. त्यामुळे ही घटना झाली. घटना घडताच राष्ट्रवादीचे महिला तालुकाध्यक्ष सुधामती कवाद व मळगंगा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विठ्ठलराव कवाद यांनी पारनेरच्या तहसीलदार भारती सागरे यांना माहिती दिली. त्यानंतर तातडीने कामगार तलाठी बी. आर. गायकवाड यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

 
तलाठी गायकवाड यांनी सर्व प्रकरणाची माहिती घेऊन पंचनामा केला. सर्व माहीती वरिष्ठांना मिळाल्यानंतर लवकरात लवकर तहसीलदारांकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु, अशी माहीती कवाद यांनी दिली.

 
यावेळी विठ्ठलराव कवाद, शिवाजी शेटे, शांताराम कवाद, विद्युत कर्मचारी नांगरे यांनी तातडीने मदत केल्याने पुढील मोठी जवितहानी व अनर्थ टळला.

LEAVE A REPLY

*