कीर्तनकाराला भामट्याकडून ‘टोपी’

0

चार लाखांची फसवणूक

अहमदनगर (प्रतिनिधी)- चित्रपट सृष्टीत कामाला लावतो असे सांगून सिद्धनाथ रामदास राऊत (रा. सुपा, ता. पारनेर) या नवोदीत कीर्तनकाराला भामट्याने चार लाख रुपयांची ‘टोपी’ घातली आहे. श्रीकांत सोनवणे असे भामट्याचे नाव असून त्याच्याविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राऊत हे भजन व कीर्तनाच्या माध्यमातून सामाजिक काम करतात. ते उत्कृष्ट वादक आहेत. आकाशवाणीच्या स्पर्धेदरम्यान नगर येथे सोनवणे व राऊत यांची भेट झाली होती. राहुरी विद्यापीठात कामाला आहे असे सांगून सोनवणे याने राऊत यांच्याशी मैत्री केली. सोनवणे याने राऊत यांना चित्रपट सृष्टीत कामाला लावतो असे नोकरीचे अमिष दाखविले. कलाकार क्षेत्रात मॅनेजर म्हणुन काम मिळेल या अमिषाने कीर्तनकार असलेल्या राऊत यांनी विश्‍वासाने सोनवणे याच्याकडे चार लाख रुपये दिले.

नोकरीच्या अमिषाने कोणी पैशाची मागणी करीत असेल तर त्याला बळी पडू नये. लाखो रूपयांची फसवणुक करण्यासाठी काही लोक बनावट कागदपत्रे, खाते क्रमांक, मेल देत असतात. त्यावर विश्‍वास ठेऊ नये. स्वत:ची कागदपत्रे व बँक खाते क्रमांक देऊन आपली अणखी फसवणुक होऊ शकतो. त्यामुळे अशा व्यक्तींपासून नागरिकांनी सावधानता बळगावी.
– अक्षय शिंदे
(सहायक पोलीस अधीक्षक)

LEAVE A REPLY

*