‘काहे दिया परदेस’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

0

‘झी मराठी’ वाहिनीवर ‘काहे दिया परदेस’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.

27 सप्टेंबरपासून ‘संभाजी’ ही ऐतिहासिक मालिका ‘काहे दिया…’ ऐवजी सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता प्रक्षेपित होईल.

सायली संजीवने यात गौरीची, तर रिषी सक्सेनाने यामध्ये शिव ही मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती.

शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी राजे यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारी ‘संभाजी’ ही नवी मालिका 27 सप्टेंबरपासून झी मराठीवर रसिकांच्या भेटीला येत आहे.

या मालिकेतून छत्रपती संभाजी राजे यांची शौर्यगाथा रसिकांना अनुभवता येणार आहे. अभिनेता अमोल कोल्हे या मालिकेत संभाजींची भूमिका साकारणार आहे.

अभिनेता शंतनू मोघे शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असून प्रख्यात अभिनेत्री प्रतिक्षा लोणकर जिजाऊंच्या भूमिकेत दिसणार आहे. 27 सप्टेंबर रोजी संभाजी मालिकेचा दोन तासांचा पहिला भाग प्रक्षेपित होणार आहे.

LEAVE A REPLY

*